बातम्या

ललित पाटील संदर्भात देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार...

Devendra Fadnavis will hold a press conference today regarding Lalit Patil


By nisha patil - 10/20/2023 4:19:45 PM
Share This News:



ललित पाटील संदर्भात देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार...

ललित पाटीलसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा

आज पत्रकार परिषदेत फडणवीस कोणता मोठा खुलासा करणार याकड सर्वांचं लक्ष 

ड्रग्ज तस्कर ललित पाटील  प्रकरणी विरोधी पक्षाकडून दोन मंत्र्यांवर आरोप होत असताना त्यावर गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मंत्र्यांनी बैठकीत चुप्पी साधली होती. याच प्रकरणावरून आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  पत्रकार परिषद घेणार आहेत. 
   

गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ललित पाटील वरून राज्याच्या मंत्र्यावर होणाऱ्या आरोपांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी दादा भुसे आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नावं घेतली होती.  त्यावेळी संबधित मंत्र्यांनी बैठकित चुप्पी साधली होती . मात्र यावर शुक्रवारी सविस्तर उत्तर देईन असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेली, परंतु आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस कोणता बॉम्ब स्फोट करणार  आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


ललित पाटील संदर्भात देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार...