बातम्या
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी
By nisha patil - 7/16/2024 9:12:52 PM
Share This News:
कोल्हापुरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी दिंगबरा दिंगबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्राबाहेर वाहत आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असतं. यंदा 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजता नदीचं पाणी दत्त मंदिरात आलं आहे.
यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा अशा जयघोषात भविकांनी या पाण्यात स्नानं केलं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे, त्यामुळे परिसरात इतका धोका नाही. पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी
|