बातम्या
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत गणेश जयंतीचा भक्तिमय सोहळा
By nisha patil - 1/2/2025 3:28:57 PM
Share This News:
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत गणेश जयंतीचा भक्तिमय सोहळा
गणपती कट्टा, जवाहर नगर येथे श्री गणेश जयंतीनिमित्त विशेष आरती व दर्शन
चांदीच्या गणपतीचे दर्शन घेऊन डॉ. राहुल आवाडे यांनी साधला भक्तीचा ठेवा
गणपती कट्टा, जवाहर नगर, इचलकरंजी येथील गणपती कट्टा ग्रुप यांच्या वतीने श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेबांनी उपस्थिती दर्शवली. मंदिरस्थळी भेट देऊन त्यांनी भक्तिभावाने श्री गणपती बाप्पाची आरती केली तसेच चांदीच्या गणपतीचे दर्शन घेतले.
कार्यक्रमास माजी नगरसेविका शकुंतला मुळीक, संतोष गुप्ते बंडू मुळीक, मनीष अग्रवाल, रियाज जमादार, मनोज हिंगमिरे, दत्ता मांजरे, सुनील कोरवी, प्रफुल जाधव, अमर माने, रवी माने, विक्रम सांगले, पिंटू पाटील, काशिनाथ माळी, शंकर मानकर, सचिन बाबर, भास्कर बांधिगिरे गणेशभक्त उपस्थित होते.
कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आणि गणेश जयंतीच्या मंगलमय सोहळ्याने सर्व भक्तगण भारावून गेले.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत गणेश जयंतीचा भक्तिमय सोहळा
|