बातम्या
धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना भेटवस्तूंचे वाटप
By nisha patil - 1/27/2025 9:31:32 PM
Share This News:
धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना भेटवस्तूंचे वाटप
कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील बालकल्याण संकुलात खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ. अंजली विश्वराज महाडिक यांनी बालकल्याण संकुलातील मुलांची भेट घेत त्यांच्या शिक्षण आणि कष्टांची माहिती घेतली.
संकुलातील अनाथ मुले, अल्पवयीन गुन्हेगार, अल्पवयीन मुली, विधवा व बेवारस महिलांना आश्रय दिला जातो. खासदार महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौ. अंजली महाडिक यांनी २ लाख रुपयांचे दान दिले. संस्थेचे कार्य आणि समाजातल्या उपेक्षित लोकांना मदत देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचा विश्वास व्यक्त केला.
धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना भेटवस्तूंचे वाटप
|