बातम्या
हक्काचे आरक्षणसाठी धनगर समाज एकवटला
By nisha patil - 9/26/2023 7:08:05 PM
Share This News:
देशाला स्वातंत्र्य मिळून75वष॓ झाली . परंतु धनगरांच्या हक्काचे आरक्षण मिळाले नाही. संविधानातील हक्काचे आरक्षणसाठी धनगर समाज अनेक वर्ष मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून लढा लढत आहे. धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे हक्काचे आरक्षणची ताबडतोब अंमलबजावणी करावी . यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून यशवंत ब्रिगेड मार्फत निवेदन देण्यात आले.
त्वरित जी. आर काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. न काढल्यास महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा . डॉ.संतोष कोळेकर यांनी दिला आहे. या निवेदनात आरक्षणाबरोबर धनगर समाजाच्या अन्य समस्यांचाही पाठपुरावा करण्यात आला आहे.
यावेळी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोळेकर, अमोल गावडे, मल्हार येडगे, प्रकाश गोरड, नामदेव लाबोरे, स्वप्निल पुजारी, शिंदे, मेघा गावडे, स्वाती वाघमोडे, संगीता शेळके आदीसह यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हक्काचे आरक्षणसाठी धनगर समाज एकवटला
|