बातम्या

स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांचे धरणे आंदोलन

Dharna movement by cheap food grain sellers and kerosene license holders


By nisha patil - 1/12/2023 3:59:40 PM
Share This News:



स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांचे  धरणे आंदोलन 

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने न्याय मागण्यासाठी केलं आंदोलन 

जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर याना दिले निवेदन 

राज्य सरकार व केंद्र सरकार यांनाही दिले मागणीचे निवेदन

 

केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे एकात्मिक व्यवस्थापन (IMPDS )हि प्रणाली कार्यान्वित करण्यात अली असून smart pds हा अंत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प सुरवातीला महाराष्ट्र राज्यासह देशातील इतर राज्यात राबवणार आहेत यामुळे रेशनिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून येणार आहेत  या वितरण प्रणालीत राज्यलाडून सामंजस्य करार केंद्रासोबत केलेला आहे, या वितरण प्रणालीत होणाऱ्या बदलामुळे राज्यातील सर्व दुकानदारांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे यासाठी रास्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्काच्या मागणी साठी तसेच धान्य वितरण करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार व परवानाधारक यांनी धरणे आंदोलन केले आहे, तसेच १ जानेवारी रेशन बंदच्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारकडे  पाठवण्याबाबत  सादर करण्यात आले. 

यामध्ये प्रामुख्याने दुकानदारांना देण्यात येणार धान्याचे मार्जिन त्वरित मिळावे ,१५०/- मार्जीन मनी वाढ करून किमान रु.३००/- मार्जिन  मंनी मिळावी . २ जी मशीन बदलून ४ जी - EPOS मशिन मिळावी ,रेशनमधील कालवाहय प्रचलीत नियम बदलून त्वरीत नवीन नियम करणे,आनंदाचा शिधा योजना कायम स्वरूपी राबवावी याच्यामध्ये पाम तेला ऐवजी सोयाबीन, सुर्यफुल तेल दयावे,ए पी एल शेतकरी लाभार्थ्यांना त्वरीत धान्य द्यावं अश्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ,या मुख्य मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करण्यात आली. 

 याआंदोलनात राज्य सेक्रेटरी कॉमेड चंद्रकांत जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, कार्याध्यक्ष दिनकर पाटील, तिप्पे आण्णा, जिल्हा उपाध्यक्ष अन्वर मोमीन, व  जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते


स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांचे धरणे आंदोलन