बातम्या

शिवप्रेमींचे मुंबई आजाद मैदानावर धरणे आंदोलन पालक मंत्री मंगल लोढा यांचे आश्वासन

Dharne movement of Shiv lovers at Mumbai Azad Maidan   Assurance of Guardian Minister Mangal Lodha


By nisha patil - 12/7/2024 9:01:20 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या मशीद बांधकामाविरोधात अनेक शिवप्रेमींनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. विशाळगडावर होत असलेल्या या अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमी नागरिक विविध मार्गांनी आपला विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर दुर्ग प्रेमी आणि शिव प्रेमी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलकांची तात्काळ भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले.

        विशाळगडावर होत असलेल्या या अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमी नागरिक विविध मार्गांनी आपला विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर दुर्ग प्रेमी आणि शिव प्रेमी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना आश्वस्त केले.                                                                                                                            
          विशाळगडाचे पावित्र्य जापण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिनंदन केले.  आंदोलकांनी  ऑर्डरची प्रत आणि निवेदन द्यावे, तुमच्या प्रतिनिधी मंडळासोबत ते निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवतो, असं आश्वासन मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 
             सामाजिक भान राखत विशाळगडावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविरोधात उभे राहिलेल्या या नागरिकांच्या आंदोलनाला मंगलप्रभात लोढा यांनी पाठिंबा दिल्याचं दिसून आले.


शिवप्रेमींचे मुंबई आजाद मैदानावर धरणे आंदोलन पालक मंत्री मंगल लोढा यांचे आश्वासन