बातम्या
धोनीनं डीआरएस घेतला अन्...
By nisha patil - 4/24/2024 5:13:35 PM
Share This News:
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर किंग्ज या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं आहे. एमएस धोनीची एक झलक पाहण्यासाठी मैदानावरील चाहते आतूर असतात. चेन्नई सुपर किंग्जचा विकेटकीपर असलेल्या महेंद्रसिंह धोनीला डिसीजन रिव्यू सिस्टीमचा मास्टर समजलं जातं. डीआरएसला देखील धोनी रिव्यू सिस्टीम म्हटलं जातं. कालच्या मॅचमध्ये धोनीनं घेतलेल्या एका डीआरएसनंतर पंचांना निर्णय बदलावा लागला.
तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जकडून 13 वी ओव्हर टाकत होता. 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पंचांना तो बॉल वाईड असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला चॅलेंज देत धोनीनं डीआरएस घेतला. डीआरएसच्या चॅलेंजनंतर रिप्ले पाहिल्यानंतर पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. यावेळी मार्कस स्टॉइनिस मैदानावर फलंदाजी करत होता. तुषारनं अखेरचा बॉल टाकताच पंचांनी लगोलग वाईड इशारा दिला होता. धोनीनं तातडीनं डीआरएस घेतला होता.
महेंद्रसिंह धोनीच्या इशाऱ्यानंतर ऋतुराज गायकवाडनं डीआरएस घेतला. यानंतर थर्ड अम्पायरनं मैदानावरील पंचांना निर्णय बदलण्यास सांगितलं. धोनीनं दिलेलं चॅलेंज, पंचांना बदलावा लागलेला निर्णय या सगळ्या गोष्टी मार्कस स्टोइनिस बघत राहिला. पंचांनी निर्णय बदलताच सोशल मीडियावर मीम्सचं वारं सुरु झालं आहे.
चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 बाद 210 धावा केल्या होत्या. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं शतकी खेळी केली होती. ऋतुराज गायकवाडनं 108 धावा केल्या. त्याला शिवम दुबेनं 66 धावांची खेळी करत साथ दिली होती. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जाएंटसची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, मार्कस स्टोइनिसनं 124 धावांची खेळी करुन लखनौला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. यानंतर गुणतालिकेत लखनौ चौथ्या स्थानावर आहे तर चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईचे साखळी स्पर्धेतील अद्याप सहा सामने शिल्लक आहेत.
चेन्नईचा चौथा पराभव
चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयानं सुरुवात केली होती. चेन्नईनं चेपॉकवरील पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं होतं. यानंतर चेन्नईसाठी आयपीएल समिंश्र राहिलेलं आहे. चेन्नईला लखनौ सुपर जाएंटसकडून दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. चेन्ननई सुपर किंग्जचं यंदाच्या आयपीएलमध्ये 8 मॅच खेळल्या त्यापैकी चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर त्यांना चार मॅचमध्ये विजय मिळाला.
धोनीनं डीआरएस घेतला अन्...
|