बातम्या

मधुमेहाच्या रुग्णांनी हे पदार्थ नाश्त्यात खावे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Diabetic patients should eat this food in breakfast


By nisha patil - 9/29/2023 8:44:57 AM
Share This News:



जगभरात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. या आजारात किडनी, डोळे, यकृत, हृदय आणि इतर अनेक अवयव कमकुवत होतात. मधुमेहावर कोणताही इलाज नाही, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य केली जाऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुम्हीही साखरेच्या वाढीमुळे हैराण असाल तर नाश्त्यात या गोष्टींचा अवश्य समावेश करा.ओट्स
कार्बोहायड्रेट्सचा स्रोत असलेल्या ओट्समध्येही भरपूर फायबर असते आणि त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. ओट्स रक्तातील साखरेचे शोषण मंद आणि स्थिर करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
 
पालेभाज्यांची चाट
पालकाचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो आणि याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सुधारते. पालकाच्या पानांचा चाट मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. तुम्ही ते नाश्ता म्हणून खाऊ शकता. मसूर डाळीचे धिरडे
भारतीय नाश्त्यात धिरडे पसंत केले जातात. डायबिटीजचे रुग्ण असल्यास मसूर डाळीचे धिरडे फायद्याचे ठरेल. या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय या डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. या मसूरच्या डाळीची पेस्ट करून द्रावण तयार करा, त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि मीठ टाका, कमी तेलात हा चीला बनवा.
भाजलेले नट्स
नट्स हा पोषक तत्वांचा खजिना आहे. ते असंतृप्त चरबी, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे समृध्द असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर न्याहारीमध्ये भाजलेले नट्स खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
इडली
इडली हलका आणि हेल्दी नाश्ता आहे. वेट लॉस डायटमध्ये इडली सामील करण्याचा सल्ला दिला जातो. बाजरी, नाचणी किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेली इडली मधुमेहामध्ये पौष्टिक असते.
 
चिया सीड्स
चिया सीड्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. डायबिटीजच्या रूग्णांसाठी ते सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते पाण्यात भिजवून खाणे. चिया बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.


मधुमेहाच्या रुग्णांनी हे पदार्थ नाश्त्यात खावे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात