बातम्या

फडणवीसांनी पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की?

Did Fadnavis shock the flood victims


By nisha patil - 9/25/2023 5:38:32 PM
Share This News:



नागपुरात  झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे महापुराचं संकट ओढावलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळातय नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी नागपुरातील नुकसानाची नुकताच पाहणी केली. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे ..या व्हिडीओ मध्ये फडणवीस  नुकसानाची पाहणी करत असताना एक नागरिक फडणवीसांच्या जवळ आला. तो फडणवीसांना झालेल्या नुकसानाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी फडणवीसांनी त्याचा हात धरला आणि त्याला गाडीच्या दिशेने नेले. यावर ट्वीट करत काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तर फडणवीसांनी त्याला रागामध्ये ओढत नेल्याचा आरोप देखील त्यांच्या कडून करण्यात येत होता. मात्र भाजपने या व्हिडीओवर स्पष्टीकरण देत विरोधकांना चोख उत्तर दिलंय 
     

भाजपने यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओसह आणखी एक व्हिडीओ सोशल मीडिया वर शेअर केला ज्यामध्ये  फडणवीसांनी त्या नागरिकाच्या घरी जाऊन दुष्काळाची पाहणी केल्याचं दिसत आहे. यावर स्पष्टीकरण देताना भाजपने म्हटलं की, 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे हे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हणाले  ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी सुद्धा गेले 'असे म्हणत भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र  सोडलं


फडणवीसांनी पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की?