बातम्या

रोनाल्डोनं सलमान खानला केलं इग्नोर?

Did Ronaldo ignore Salman Khan


By nisha patil - 10/30/2023 8:24:24 PM
Share This News:



सौदी अरेबियामधील रियाध येथे  टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यात बॉक्सिंग सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी सलमान खाननं  हजेरी लावली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि कोनोर मॅकग्रेगर  यांनी देखील हा सामना पाहिला. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका फोटोमध्ये रोनाल्डो आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले.

सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोनाल्डो हा सलमानला सोडून इतर प्रेक्षकांना भेटताना दिसत आहे.   त्यामुळे रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे. कमाल आर खाननं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा  जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि तो छोट्या-मोट्या कलाकारांना ओळखत नाही. रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं, अशी चर्चा आता केआरकेनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर होत आहे.


रोनाल्डोनं सलमान खानला केलं इग्नोर?