बातम्या
ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो नाही : मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 7/15/2023 6:46:08 PM
Share This News:
ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो नाही : मंत्री हसन मुश्रीफ
ईडीच्या कारवाईमध्ये न्यायालयाने दिलासा दिला असून ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे खाते वाटपानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटावर टीका करू नका त्यांचं काम त्यांना करू द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला कुठे विरोध केला नाही शरद पवार साहेब हेच आमचे विठ्ठल आहेत आणि राहणार असेही यावेळी मुस्लिम यांनी सांगितलं.
ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो नाही : मंत्री हसन मुश्रीफ
|