विशेष बातम्या

पाण्याची बॉटल साफ करणं अवघड? 'या' किचन हॅक्स वाचा

Difficult to clean water bottles Read these kitchen hacks


By nisha patil - 1/6/2023 7:00:13 AM
Share This News:



पाण्याची बॉटल कशी साफ करायची?

गरम पाणी

प्लॅस्टिकच्या भांड्यांवर साचलेली घाण खूप कडक असते, त्यामुळे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता.

काच आणि स्टीलच्या बाटली साठीही याची मदत घेता येते. थेट भांड्यात गरम पाणी टाकू नका कारण हे प्लास्टिक वितळू शकते आणि काच फुटू शकते. यासाठी तुम्ही एका मोठ्या भांड्यात पाणी काढा आणि मग त्यात थोडं थोडं पाणी घालत राहा. यामुळे बाटली साफ होईल आणि हानिकारक जंतूदेखील नष्ट होतील.

लिंबू, मीठ आणि बर्फ

भांडी नीट स्वच्छ करायची असतील तर त्यासाठी त्यात अर्धी वाटी पाणी घाला. नंतर त्यात लिंबू, मीठ आणि आईस क्यूबचे चार तुकडे घालून चांगले हलवावे. असे केल्याने बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल आणि सर्व जीवाणू मरतील.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

आपण पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर देखील वापरू शकता, कारण ते क्लीनिंग एजंट म्हणून कार्य करते. त्यासाठी बाटलीत एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे व्हिनेगर टाकून मग त्याचे झाकण बंद करून हलवावे आणि नंतर थोडा वेळ तसेच ठेवावे. मग बाटली स्वच्छ पाण्याने धुवून झाकण उघडून ती बाटली कोरडी करायला ठेवावी.


पाण्याची बॉटल साफ करणं अवघड? 'या' किचन हॅक्स वाचा