बातम्या
कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या घराची दुरावस्था
By nisha patil - 2/12/2023 4:48:02 PM
Share This News:
भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण काम केले होते, कमवा आणि शिका योजना तसेच रयत शिक्षण संस्था ही त्याच कामाची उदाहरणे आहेत. पण त्यांच्या जन्मगाव असलेल्या ठिकाणी घराची अवस्था पडीक झाल्याचे चित्र दिसून येतेय.
कर्मवीर भाऊराव पाटील यांंचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी त्यांंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावात शेतकरी कुटुंबात झाला. भाऊराव यांनी लहानपणापासुनच आपले आयुष्य जात-पात न पाळता असपृश्यांंसोबत आणि त्यांंच्यासाठी खर्ची घातले होते, त्यांंच्यावर राजर्षी शाहु महाराज यांंच्या कामाचा मोठा प्रभाव होता. भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण काम केले होते, कमवा आणि शिका योजना तसेच रयत शिक्षण संस्था ही त्याच कामाची उदाहरणे आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. 'स्वावलंबनाने कष्ट करून शिका' हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील यांना 1959 साली त्यांच्या कार्याबद्दल 'पद्मभूषण' हा पुरस्कारही मिळाला. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मता ठिकाणी असलेले घराची अवस्था पडीक झाली आहे त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे असे नागरिक आवाहन करत आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या घराची दुरावस्था
|