बातम्या
दिलखुलास, जय महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. मधुकर गायकवाड यांची मुलाखत
By nisha patil - 10/7/2024 12:56:54 PM
Share This News:
जागतिक हेपॅटायटीस दिवस दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पावसाळ्यात होणारे आजार तसेच झिका व्हायरस यासंदर्भात नागरिकांनी घ्यायची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती जे.जे रुग्णालय, मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्राचे पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
हेपॅटायटीस हा यकृताशी निगडित आजार आहे. ज्यामध्ये यकृताला सूज येते आणि त्यामुळे पेशींचे नुकसान होते. हेपॅटायटीस ही सामान्यतः विषाणूजन्य संसर्गामुळे उद्भवणारी समस्या आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि झिका यासारखे विविध विषाणूजन्य आजार पसरत असतात. आरोग्य विभागामार्फत या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगानेच या आजारांची लक्षणे आणि त्यावरील प्रभावी औषधोपचार पद्धती तसेच गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी याबाबतची सविस्तर माहिती डॉ. गायकवाड यांनी 'दिलखुलास' व ' जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, बुधवार दि. 10 आणि गुरुवार दि. 11 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 11 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दिलखुलास, जय महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. मधुकर गायकवाड यांची मुलाखत
|