बातम्या

कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल; खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी!

Direct flights from Kolhapur to Delhi will start from October 27


By nisha patil - 8/13/2024 10:10:34 PM
Share This News:



२७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे १८० आसन क्षमतेचे विमान या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. 

विमान सकाळी १०:१० वाजता दिल्लीहून उड्डाण करेल आणि दुपारी १२:५५ वाजता कोल्हापुरात येईल. कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवेसाठीची मंजुरी भारतीय विमानपतन प्राधिकरणाच्या महासंचालकांकडे अंतिम टप्प्यात आहे.


कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल; खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी!