बातम्या
थेट पाईप लाईन मधील घोटाळ्याची चौकशी लावणार - खा.धनंजय महाडिक
By nisha patil - 3/13/2024 4:37:11 PM
Share This News:
थेट पाईप लाईन मधील घोटाळ्याची चौकशी लावणार - खा.धनंजय महाडिक
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी "थेट पाईपलाईन योजना ही तेरा वर्षे रखडली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका हिस्सामधून अर्थात नागरिकांच्या पैशातून योजना झाली. पाईपलाईन टाकण्यापासून, स्पायरल वायडिंग पाईपपर्यंत गौडबंगाल दिसत आहे. या योजनेमध्ये घोटाळा झाला आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी करावी लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना भेटून केंद्रीय कमिटी मार्फत पाईपलाईन योजनेची चौकशी व थर्ड पार्टी ऑडिट करू." असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला
खासदार महाडिक, महानगरपालिकेतील गटनेते सत्यजित कदम, माजी नगरसेवक आशिष ढवळे किरण नकाते, प्रदीप उलपे, मनीषा कुंभार, विजय देसाई यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुईखडी येथे जाऊन योजनेच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी बोलताना खासदार महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. केवळ श्रेयवाद लाटण्यासाठी सतेज पाटील यांनी कामे अपुरे असताना योजना पूर्ण केल्याचे जाहीर केले. अभ्यंगस्नानाचा दिखावा करत लोकांची फसगत केली. मुळात योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत. धरणातून पुईखडीपर्यंत पाणी पोहोचले. परंतु शहरात पाणी पुरवठा वितरण करण्याची यंत्रणा महापालिकडे सक्षमरित्या उपलब्ध नाही.पाणी वितरित करण्याची प्रक्रिया कमकुवत असताना सतेज पाटील यांनी योजना पूर्ण झाली असे खोटे का सांगितले. अजूनही अनेक कामे पूर्ण नाहीत. निश्चितच या योजनेमध्ये काहीतरी गौडबंगाल आहे.५३ किलोमीटर पाईपलाईनसाठी स्पायरल वाइंडिंग पाईप वापर करायचे होते. मात्र स्पायरल वायडिंग पाईपचा वापर केला नाही हे समोर येत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी लागेल. वास्तविक थेट पाईपलाईन योजनेच्या वस्तुस्थितीची माहिती लोकांना व्हावी यासाठी संबंधितांनी श्वेतपत्रिका काढावी असे आव्हान ही महाडिक यांनी दिले.
महाडिक म्हणाले, 'थेट पाईपलाईन योजनेच्या श्रेय वादासाठी मी इथे आलो नाही. तर शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने काय मदत करता येईल यासाठी भेट दिली आहे. गेले अनेक महिने झाले शहरात पाण्याची वाणवा आहे. महिला घागरी घेऊन आंदोलने करत आहेत. पाईपलाईन योजनेअंतर्गत शहरामध्ये बारा टाकी बांधायच्या होते. केवळ चारच टाकी बांधले आहेत. शहरातील पाणी वितरण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून पाच कोटी रुपयांची निधी दिला आहे."असेही महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले.
तुम्हाला उत्तर द्यावे लागतील.......
खासदार महाडिक, सत्यजित कदम, किरण नकाते, विजय देसाई यांनी अपुरे पाणी पुरवठावरून जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अपुरा पाणीपुरवठा योजनेवर माहिती देताना अनेकदा शहर अभियंता सरनोबत निरुत्तर झाले. त्यावेळी खासदार महाडिक यांनी तुम्हाला निरुत्तर होऊन चालणार नाही शहरवासीयांना उत्तरे द्यावे लागतील. नागरिकांच्या पैशातून ही योजना झाली आहे. शहरवासीयांना किती दिवसात मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकेल हे स्पष्ट करा असेही महाडिक यांनी सांगितले. त्यावर पाणीपुरवठा अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी एका महिन्याच्या कालावधीमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करू असे सांगितले. तेव्हा महाडिक यांनी एक महिनाभर वाट पाहू. पंधरा एप्रिल पर्यंत पाणीपुरवठा कशा पद्धतीने होते ते पाहू त्यानंतर परत एकदा योजनेच्या ठिकाणी भेट देऊन योजना कशी गतीमान करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. योजना गतिमान होईल या दृष्टीने प्रयत्न करू."असे महाडिक यांनी सांगितले. यावेळी संजय सावंत, संतोष लाड, शैलेश पाटील, राजू जाधव, विशाल शिराळकर, वैभव माने आदी उपस्थित होते.
थेट पाईप लाईन मधील घोटाळ्याची चौकशी लावणार - खा.धनंजय महाडिक
|