बातम्या

थेट निवडणूक प्रचारात आयपीएलचा दाखला देत.....

Directly citing IPL in election campaign


By nisha patil - 8/5/2024 5:47:01 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडलंय. चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके  आणि भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे रिंगणात आहेत. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे सभा पार  पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत  आणि काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रचारात आयपीएलचा दाखला देत गुजरात कनेक्शन जोडलं. 
 

 मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा  व्हायला हवा तर तिथं हार्दिक पांड्या कॅप्टन झाला. तिथे क्रिकेटवाले लोक नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राजकारण ठीक आहे. पण खेळातही गुजरात पाहायला लागलात तर, तुम्हाला गुजरातलाच जावं लागेल, असं थोरात म्हणाले.


थेट निवडणूक प्रचारात आयपीएलचा दाखला देत.....