बातम्या

हिरवी मिरची खाण्याचे तोटे!

Disadvantages of eating green chillies


By nisha patil - 9/18/2023 7:41:44 AM
Share This News:



हिरवी मिरची खाण्याचे तोटे! वाचा काय होतात आरोग्यावर दुष्परिणाम

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचे एक कंपाउंड असते. या कॅप्सॅसिन मुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खावीशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते.रक्तदाब वाढणे: कॅप्सॅसिन ने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाउंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तिखट कमी खा असं सांगितलं जातं. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये.हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते, पोटात जळजळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी होते.काही आजार आहेत ज्यात हिरवी मिरची, तिखट खाऊ नका असं सांगितलं जातं. टीबी या आजारामध्ये हिरवी मिरची न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.कॅप्सॅसिन या कंपाउंड मुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होते. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हिरवी मिरची देखील प्रमाणात खावी.


हिरवी मिरची खाण्याचे तोटे!