शैक्षणिक
“विवेकानंद महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण”
By nisha patil - 7/2/2025 7:15:46 PM
Share This News:
“विवेकानंद महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण”
कोल्हापूर दि.07 - येथील विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कक्षाच्या वतीने विवेकानंद महाविद्यालय आणि जीवन मुक्ती सेवा संस्था ( व्हाईट आर्मी) यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन सारख्या पूरक अभ्यासक्रमाचे धडे यावेळी देण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम जीवन मुक्ती सेवा संस्था यांच्याशी असलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्हाइट आर्मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अशोक रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची देशाला असलेली गरज आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती बळकटीस यावी यासाठी त्यांनी गेल्या 25 वर्षातील महापूर, भू्स्खलन, चक्रीवादळ, सुनामी, आग यासारख्या आपत्तीवेळी केलेले बचाव कार्य विद्यार्थ्यांसमोर दृक श्राव्य् माध्यमाद्वारे मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी परंपरागत अभ्यासक्रमा व्यतिरिक्त एन.एस.एस., एन.सी.सी, स्पोर्ट्स, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या गोष्टींची गरज आजच्या शिक्षण व्यवस्थेत अनिवार्य आहे असे उद्गार काढले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल ऑफिसर डॉ. सी. बी. पाटील यांनी केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार व रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ. अभिजित कासारकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बी.बी.ए. व बी.सी.ए भाग-१ चे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
“विवेकानंद महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण”
|