राजकीय

पासार्डेतील महालक्ष्मी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा खूलासा

Disclosure of office bearers of Mahalakshmi Seva Sanstha in Pasarde


By nisha patil - 11/11/2024 12:43:15 PM
Share This News:



आम्ही सदैव काॅग्रेस सोबतच... करवीर मधील कार्यकर्ते काय म्हणाले पहा...

पासार्डेतील महालक्ष्मी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा खूलासा 

पासार्डे प्रतिनिधी.... विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा निवडणुकीत रंग भरला जात आहे..गटा गटात चूरस ईर्षा, पहायला मिळत आहे..यातून एकामेकावर आरोप प्रत्यारोप,सभा, प्रचार फेरी, फोडाफोडी, जेवणावळी यामूळे मतदार राजा काही अंशी सुखावला असल्याच चित्र आहे..

     शनिवारी पासार्डे येथे नरके गटाची सभा झाली होती.या सभेत महालक्ष्मी सेवा संस्थेच्या सर्व संचालकांचा नरके गटात  जाहीर प्रवेश ,पाठींबा अशा आशयाचा मजकूर सोशल मिडिया व प्रसिद्धी पत्रकात व्हायरल करण्यात आला होता.पण उर्वरित सदस्यांनी आम्हांला विश्वासात न घेताच  व आमच्या अनुपस्थितीत आमची नाव घालून आम्हाला बदनाम केल असा आरोप ही यावेळी करण्यात आला..
   आम्ही मुळचे स्वर्गीय पी एन साहेब यांना माननारे व राजेंद्र सुर्यवंशी भाऊ गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत.आम्ही सदैव काॅग्रेस सोबतच आहोत असा खूलासा प्रविण चौगले यांनी केला..

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
महालक्ष्मी सेवा संस्थेचे संचालक सदाशिव लक्ष्मण चौगले होते.लोकनियुक्त सरपंच विष्णू पाटील यांनीही आम्ही सर्वजण एकसंध आहोत.थापा मारून मत मिळत नाहीत..केलेल्या विकासकामांवर बोला.आम्ही केलेल्या विकासकामांची यादी आपण वाचून दाखवू नका असा टोलाही लगावला..राहुल पाटील यांना पासार्डे व पाचाकटेवाडीतून मताधिक्य देणारच अशी हमी दिली..

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संभाजी चाबूक यांनी काल पासार्डेत काॅग्रेस ला खिंडार अशा आशयाचा संदर्भ देत सांगितले की, महालक्ष्मी सेवा संस्थेचे संचालक आमच्या सोबतच आहेत...गावात खिंडार बिंडार पडलेल नाही ही केवळ मतांसाठी केलेली स्टंटबाजी आहे.. आम्हीच सर्वजण मिळून त्यांच्यांच पाच पन्नास मतांना खिंडार पाडू आणि मताधिक्य देवू... यावेळी महालक्ष्मी सोसायटी संचालक संभाजी चौगले,साऊताई पाटील,कैलास कांबळे,अंबाजी चौगले,विलास चौगले, नितीन चौगले दिनकर चौगले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


पासार्डेतील महालक्ष्मी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा खूलासा