बातम्या

कोल्हापूर उत्तरमध्ये कृष्णराज महाडिक यांचीच चर्चा,

Discussion of Krishnaraj Mahadik in Kolhapur North


By nisha patil - 10/19/2024 10:09:48 PM
Share This News:



कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुतीकडून अनेक इच्छुक उमेदवारांची चर्चा आहे. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे. 2022 च्या पोटनिवडणुकीत भाजपने 80,000 हून अधिक मते मिळवली होती, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. मात्र, दुसरीकडे हा मतदारसंघ शिंदे गटाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असं असलं तरी खासदार धनंजय महाडिक हे कृष्णराज महाडिक यांनाच ही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या ते फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.धनंजय महाडिक हे भाजपला जास्तीत जास्त संधी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आता इच्छुक असणाऱ्या महायुतीतील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांचीही कोंडी होणार असून कोल्हापूर उत्तर मधील भाजप शिंदे गट संघर्ष शिगेला पोहोचणार यात शंका नाही


कोल्हापूर उत्तरमध्ये कृष्णराज महाडिक यांचीच चर्चा,