बातम्या
विमानतळ विस्तारीकरणामध्ये बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा
By nisha patil - 1/28/2025 7:18:31 PM
Share This News:
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगीतील बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी माननीय सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
यामध्ये लक्ष्मीवाडी, गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबांतील 47 पैकी 31 कुटुंबिय अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत, भुसंपादन प्रक्रियेमधेय खाजगी वाटाघाटीसाठी मुदतवाढ द्यावी, या प्रक्रियेमध्ये काही रहिवाशांना कोणताही मोबदला न देता सातबारा पत्रकावरून त्यांची नावे कमी करण्यात आली. या महत्वाच्या आणि अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आलीय.
यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचा पाठपुरावा करण्याबाबतच्य़ा सुचना देऊन बाधित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शशिकांत खोत, माजी सदस्य बाबासो माळी, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर तसेच रावसाहेब पाटील, शिवाजी सोनुले यांच्यासह विमानतळ परिसरातील बाधित नागरीक, विविध खात्याचे शासकिय अधिकारी उपस्थित होते.
विमानतळ विस्तारीकरणामध्ये बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा
|