बातम्या

ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा

Discussion with farmers and members on issues related to sugarcane


By nisha patil - 10/7/2023 12:28:27 PM
Share This News:



कुभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि,हुपरी यांच्यावतीने शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे सभासद व शेतकरी वर्गासाठी हितगुज दौरा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.   या प्रसंगी ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा करण्यात आली.
 
यावेळी संचालक गौतम इंगळे, संचालक दादासो सांगावे, संचालक संजय कोथळी, माजी संचालक एन डी पाटील, आण्णासाहेब सभुशेटे, बबन मुरगुंडे, पंचगंगा कारखान्याचे संचालक रावसाहेब बगाटे, उप शेती अधिकारी भास्कर पट्टनकुडे, बाबासाहेब कल्याणी, राजू धुळा सावंत, भरत हावले यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.


ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा