बातम्या

दिशा सॅलियन प्रकरणात 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा', नितेश राणेंचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र

Dismiss that officer in Disha Salian case Nitesh Rane s letter to Special Commissioner of Police


By nisha patil - 12/25/2023 7:03:43 PM
Share This News:



दिशा सॅलियन प्रकरणात 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा',  नितेश राणेंचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र

दिशा सॅलियन प्रकरणात एसआयटीमधून'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा' अशा आशयाचे पत्र  भाजप आमदार नितेश राणे यांन विशेष पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या हकालपट्टीची  मागणी पत्र लिहित केली आहे. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे राणेंनी  मागणी केली आहे. याआधी थातूर मातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. 
 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्तांना नितेश राणेंनी पत्र लिहिले आहे.सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा संशयास्पद  8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर सहा दिवसानंतर 14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला होता.सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंबंधीच्या केसचा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला आहे. 

'दिशा सालियन' मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस स्टेशनच्या आरोपी अधिकाऱ्यानी थातुर मातुर तापस करुन संगणमताने बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तत्कालीन ACP यांच्यामार्फत प्रकरण अपघात दाखवून बंद केले. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा Re-open करून पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केली. त्या एसआयटी मध्ये चुकून मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे.
 

 उच्च न्यायालयाने  या प्रकरणात ठरवून दिलेल्या कायद्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनच्या कोणताही अधिकारी केसचा तपास करू शकत नाही. त्यामुळे  चिमाजी आढाव हे एसआयटी चे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र असुनसुद्धा एसआयटी मध्ये सदस्य असल्यामुळे एसआयटी ही बेकायदेशीर ठरली आहे.
 एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश 

 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी  अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर  मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.  


दिशा सॅलियन प्रकरणात 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा', नितेश राणेंचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र