बातम्या

कोल्हापूर गव्याला हुसकावणे पडले महागात

Disposing of Kolhapur cow became expensive


By nisha patil - 3/7/2023 1:30:04 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :   करंजफेण (ता. शाहूवाडी) येथील मुख्य बाजारपेठेलगत उसाच्या शेतात रविवारी दि. २ दुपारी साडेचारच्या सुमारास दोन गवे आल्याची चर्चा होताच बघ्यांची गर्दी झाली.गव्यांना हुसकावण्यासाठी काही तरुण शेतात घुसले होते. गवत कापून शेतातून दोघेजण येताना दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांचा पाठलाग करत धडक देण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही तरुण बांधावरून खाली पडले. गवा पुन्हा चाल करत असताना प्रसंगावधान राखून लोकांनी दगड भिरकावल्याने गवा मागे परतला. त्यामुळे दोघेही तरुण वाचले. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
 

…अन्यथा कायदा हातात घेऊ
गवा हा शांतताप्रिय प्राणी आहे. वनविभागाने जंगलात चारा-पाण्याची व्यवस्था केली असती तर तो मानवी वस्तीकडे फिरकला नसता. वनविभागाने राखीव क्षेत्रात चारा पाण्याची सोय करावी; अन्यथा शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

 


कोल्हापूर गव्याला हुसकावणे पडले महागात