शैक्षणिक
वार्षिक परीक्षा व मूल्यमापन चाचणीबाबत वाद, महामंडळाचा कोर्टात जाण्याचा इशारा
By nisha patil - 3/29/2025 5:16:54 PM
Share This News:
वार्षिक परीक्षा व मूल्यमापन चाचणीबाबत वाद, महामंडळाचा कोर्टात जाण्याचा इशारा
मुंबई – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करण्याची सूचना दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या निर्णयानुसार राज्यातील शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार असून, परीक्षा 25 एप्रिलपर्यंत होणार आहेत.
मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "हा निर्णय अन्यायकारक असून, विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण वाढवणारा आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत."
दरम्यान, या वादामुळे राज्यातील शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने या प्रकरणावर लवकर निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून केली जात आहे.
वार्षिक परीक्षा व मूल्यमापन चाचणीबाबत वाद, महामंडळाचा कोर्टात जाण्याचा इशारा
|