पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास

Distortion of Pankaja Mundes statement


By nisha patil - 1/6/2023 6:46:59 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  'मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे', असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले. 
दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत."
पंकजाताई थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो' 
त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास आहे. मी त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असं मला वाटतं


पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास