बातम्या

राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 150 डझन वह्यांचे वाटप

Distribution of 150 dozen books to needy students on the occasion


By Administrator - 6/27/2023 12:57:42 PM
Share This News:



राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 150 डझन वह्यांचे वाटप

तारा न्यूज वेब टीम :  भाजपचे राज्यसभा  खासदार धनंजय महाडिक  यांच्या विशेष  प्रयत्नातून  जुना बुधवार पेठेतील राहुल घाटगे सरकार व मित्रपरिवार त्यांच्या ग्रुप कडून गरजू विद्यार्थी विद्यार्थ्यांना  तब्बल 150 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले.

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अर्बन बँकेचे मा. कर्मचारी सुरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत.

या कार्यक्रमाला उद्योजक सतीश जोंधळे, राजेंद्र काकडे, घनश्याम घोडके, सुजित मरळकर, विजय लोखंडे, बाबुराव चव्हाण,संदीप डोईफोडे,राकेश घाटगे, प्रकाश जाधव,चेतन शिंगटे, प्रणव पोवार, रवींद्र पवार सुनील कांबळे, व राहुल घाटगे सरकार यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 150 डझन वह्यांचे वाटप