बातम्या

जिल्ह्यात आनंदाच्या शिद्याचे वाटप बुधवारपासून

Distribution of Ananda Shidya in the district from Wednesday


By nisha patil - 10/20/2023 4:22:22 PM
Share This News:



जिल्ह्यात आनंदाच्या शिद्याचे वाटप बुधवारपासून

दिवाळीसाठी जिल्ह्यात पाच लाख 65 हजार 796 कार्डधारकांना याचा लाभ

 दिवाळीसाठी ही आनंदाचा शिदा दिला जाणार आहे त्याचे वाटप बुधवारी 25 पासून करण्यात येणार आहे असे आदेश राज्य शासनाने गुरुवारी दिले आहेत राज्यात या योजनेअंतर्गत एक कोटी 58 लाख 33 हजार 718 कार्ड धारकांना लाभ दिला जाणार

योजनेअंतर्गत यापूर्वी चार वस्तू दिल्या जात होत्या त्या दिवाळीसाठी मैदानी पोहे याचा समावेश केला आहे त्यामुळे साखर खाद्यतेल प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ मैदा आणि पोहे प्रत्येकी अर्धा किलो अशा सहा वस्तूंचा संच 100 रुपयात दिला जाणार आहे कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या या संचातील वस्तूंच्या दर्जाबाबत दक्षता घ्या अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत मैदा आणि रवा या वस्तूंची खाण्यायोग्य मदत संपण्यास किमान तीन महिन्यापेक्षा अधिक तर अन्य चार पदार्थांच्या साठी चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी राहणार नाही याचीही खात्री करण्याची सूचना देण्यात आली आहे गौरी गणपती सणासाठी आनंदाचा शिधा दिला होता या शिधा वाटपात कोल्हापूर आघाडीवर होते पुणे विभागातील पहिल्या पाच पैकी तीन जिल्ह्यांनी राज्यात आघाडी घेतली त्यात कोल्हापूरचा समावेश होता प्रशासनाने वेळेत सुद्धा उपलब्ध करून दिला दुकानदारांनी ही तो वेळेत शिधापत्रक धाराकांना पोहोच केला याबाबत पुणे विभाग पुरवठा उपायुक्त समीक्षा चंद्रकांत यांनी दुकानदारांचे विशेष कौतुक केले या शिदासंचापैकी एक घटक असलेले पोहे जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाले येत्या चार-पाच दिवसात सर्वच वस्तू दाखल होणार आहेत संच पूर्ण झाल्यानंतर दुकानदारांना त्याचे वितरण केले जाईल आणि त्यानंतर ते ग्राहकांना दिले जाणार आहे


जिल्ह्यात आनंदाच्या शिद्याचे वाटप बुधवारपासून