बातम्या

करवीर पोलिसांकडून वारकर्यांना सवलत पासचे वाटप

Distribution of Concession Passes to Warkaryas by Karveer Police


By nisha patil - 9/7/2024 2:33:04 PM
Share This News:



मुख्यमंत्री,व महाराष्ट्र शासन यांच्या विविध  विभागांनि  दिलेल्या सूचनेनुसार पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक व वारकऱ्यांना आषाढी एकादशीनिमित्त आज करवीर पोलिसांकडून टोल फ्री पास चे वाटप करण्यात आलं . 

शासनाने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्यासाठी  ३ जुलै ते  २१ जुलै २०२४ या कालावधीत पालख्या जड ,वाहनांसाठी टोलमुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

यासाठी गाडी क्रमांक, चालकाचे नाव, असा मजकूर नमूद करून आवश्यक आहे. त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधित आरटीओ, यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन,वाहतूक पोलीस, चौकी व आरटीओ ऑफिस मध्ये उपलब्ध करून द्यावेत.अशा सूचना राज्य शासनामार्फत देण्यात आल्यात 
 
त्यानुसार करवीर पोलीस ठाणे येथे पास देणे सुरू आहे, करवीर पोलीस ठाण्याकडून आज वारकरी बंधूंना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन टोल फ्री पास, पांढरी टोपी व उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू पॅकेट देण्यात आल.

करवीर पोलिस ठाणे यांनी राबवलेल्या या संकल्पनेमुळे वारकरी, नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.


करवीर पोलिसांकडून वारकर्यांना सवलत पासचे वाटप