बातम्या
इचलकरंजीत खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नवदुर्गा पुरस्काराचे वितरण
By nisha patil - 10/23/2023 7:08:36 AM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्या इचलकरंजी शाखेच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 9 शिक्षिकांना नवदुर्गा पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा व सौ.गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समितीचे अध्यक्ष प्रशांत गुरव,कार्याध्यक्ष सचिन वारे,सौ.शितल खानाज,उपाध्यक्षा सौ.रेखा भोसले,संध्या सोनवणे,सौ.शमशाद मणेर,महिला आघाडी प्रमुख सौ.मंदाकिनी चिंदके, सचिव सौ.रजनी घोडके, खजिनदार बसगोंडा पाटील, सागर शेंडे, बाळासाहेब मोकाशी यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक समितीचे अध्यक्ष प्रशांत गुरव यांनी केले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समितीचे कार्याध्यक्ष सचिन वारे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला.प्रमुख पाहुण्या श्रीमती सुप्रिया गोंदकर यांच्या हस्ते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. राजश्री संजय चव्हाण,सौ.गायत्री संभाजी पोवार,सौ.रुपाली बाळासाहेब माने,सौ. सारिका विज्ञान उपाध्ये,सौ.वंदना अमोल चव्हाण,सौ. ज्योती नंदकुमार गाडेकर,सौ.आरती सुधीर पाटील,सौ. सोनल भगवान जाधव,सौ. मंगल रंगराव चौगुले या शिक्षिकांना नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी शिक्षिकांना नवदुर्गा पुरस्कार वितरण
उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी व अत्यंत स्तुत्य असा आहे. तसेच महिलांनीही शैक्षणिक कार्याबरोबर समाजकार्य , राजकारण यातही आपला सहभाग वाढवावा अशी इच्छा व्यक्त केली.पुरस्कार प्राप्त सर्व नवदुर्गांच्या वतीने सौ.आरती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसगोंडा पाटील यांनी केले तर आभार सौ. मंदाकिनी चिंदके यांनी मानले.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्या इचलकरंजी शाखेचे सर्व पदाधिकारी , सदस्य व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
इचलकरंजीत खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नवदुर्गा पुरस्काराचे वितरण
|