बातम्या
आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते पूजा व महाप्रसाद वितरण...
By nisha patil - 1/31/2025 7:49:13 PM
Share This News:
आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते पूजा व महाप्रसाद वितरण...
टोप, ता. हातकणंगले – येथील श्री साई मंदिरात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) व सौ. रेखाताई अशोकराव माने यांच्या हस्ते श्री साई चरणी पूजा व अभिषेक घालण्यात आला.
धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या विधीनंतर सायंकाळी आमदार डॉ. माने यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी आप्पासाहेब गायकवाड, मानसिंग गायकवाड, चंद्रकांत कदम, शिवाजी पाटील, श्रीधर पाटील यांच्यासह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते पूजा व महाप्रसाद वितरण...
|