बातम्या

इचलकरंजीत ताराराणी पक्षाच्या पथविक्रेता समितीमध्ये नवनियुक्त सदस्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण; डॉ. राहुल आवाडे आणि सानिका आवाडे यांच्या हस्ते अभिनंदन

Distribution of appointment letters to newly appointed members in Ichalkaranjit


By nisha patil - 3/9/2024 9:28:58 PM
Share This News:



इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखालील पेठ वडगाव शहर पथविक्रेता समिती सदस्य पदी गणेश जोतीराम खटावकर, सचिन वसंत फडणीस, प्रियांका पांडूरंग गांजणे, अरशद सिकंदर तांबोळी या ताराराणी पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते व कु. सानिका आवाडे दिदी यांच्या उपस्थितीत नवनियुक्तांना नियुक्ती पत्रे प्रदान करून अभिनंदन केले.

यावेळी ताराराणी युवा जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे मामा, ताराराणी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना सुहास कांबळे, ताराराणी शहराध्यक्ष फहिम पाथरवट, ताराराणी युवा शहराध्यक्ष सतीश मुळीक, मा. नगरसेवक राजू बोंद्रे, सौरभ परदेशी उपस्थित होते.


इचलकरंजीत ताराराणी पक्षाच्या पथविक्रेता समितीमध्ये नवनियुक्त सदस्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण; डॉ. राहुल आवाडे आणि सानिका आवाडे यांच्या हस्ते अभिनंदन