राजकीय

संजय गांधी योजनेच्या 3 हजार लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप सुरु - अनिल डाळ्या

Distribution of approval letters to 3 thousand beneficiaries of Sanjay Gandhi Yojana started  Anil Dalya


By nisha patil - 1/7/2023 11:24:15 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम इचलकरंजी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या यांची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असणारी निराधार नागरिकांची प्रकरणे निकालात निघाली असून या योजनांच्या मंजुरीपत्र वाटपाचे काम सुरू झाले आहे ,अशी माहिती या योजना समितीचे इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल यांनी दिली.

यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या विविध योजनेतील विधवा, निराधार महिला, अपंग, वयोवृद्ध, निराधार महिला व पुरुषांनी शहापूर, तारदाळ, खोतवाडी, चंदुर, कबनूर, कोरोची या गावच्या लाभार्थ्यांच्या मंजुरी पत्रांचे वाटप प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडून करण्यात येणार आहे. तसेच इचलकरंजी शहराच्या च्या लाभार्थ्यांनी इचलकरंजी संजय गांधी कार्यालय येथे वाटप सोमवार दिनांक ३ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे.
सदर मंजुरीपत्रे ही सर्व लाभार्थ्यांनी तलाठी यांच्याकडून घ्यायची असून सर्व मंजूर लाभार्थ्यांनी ह्या मंजुरी पत्राचे झेरॉक्स व आधार कार्ड घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे. ही सर्व प्रक्रिया मोफत असून यासाठी कोणत्याही दलालाची मदत घेऊ नये व कोणाला ही पैसे देऊ नये तसेच याबाबतीत काही समस्या असल्यास संजय गांधी निराधार योजना कार्यालय इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन समिती अध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या यांनी केले आहे.


संजय गांधी योजनेच्या 3 हजार लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप सुरु - अनिल डाळ्या