बातम्या
वारणानगर येथे विविध सामाजिक कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप
By nisha patil - 10/15/2024 7:28:14 PM
Share This News:
वारणानगर (ता.पन्हाळा) येथे संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनेंतर्गत पात्र ३५३ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले...
पन्हाळा तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेत जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ मध्ये १२०० लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आला.तसेच संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले...
यावेळी पन्हाळा नायब तहसीलदार रोहिणी गायगोपल,पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ गणा जाधव,पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य एकनाथ पाटील,विकास गायकवाड,अजित कदम,छाया मारुती पाटील,दिलीप पाटील यांच्यासह संजय गांधी निराधार समितीचे सर्व सदस्य,मंडल अधिकारी,सर्व गावचे तलाठी,सर्व पोलीस पाटील यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
वारणानगर येथे विविध सामाजिक कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप
|