बातम्या

 जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण…

Distribution of assistive devices to 448 disabled persons in the district


By nisha patil - 2/25/2025 12:34:35 PM
Share This News:



 जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण…

मी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे : ना.प्रकाश आबिटकर

स्टेट बँक ऑफ, इंडियाच्या सामाजिक कृतज्ञता निधीतून अलिमको मार्फत आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाज कल्याण विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय.

यावेळी दिव्यांगांची ओळख ठरणारे वैश्विक कार्ड तालुका पातळीवर वैद्यकीय तपासणी करून देण्याची घोषणा ना. प्रकाश आबिटकरांनी केली. ना. प्रकाश आबिटकर बोलताना म्हणाले, दिव्यांगांच्या नशिबात शरीराने दिव्यांगता आली असली तरी त्यांच्यातील वेगवेगळ्या कला व गुण हेच त्यांचे वरदान आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने मनापासून कार्यरत राहावे. यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

या समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अमेय जोशी, यांच्यासह प्रमुख मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.


 जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण…
Total Views: 44