बातम्या

शिरढोणमध्ये म.गांधी जयंतीनिमित्त वह्या वाटप

Distribution of booklets on the occasion of M  Gandhi Jayanti in Shirdhon


By nisha patil - 3/10/2023 8:51:21 PM
Share This News:



शिरढोण(संजय गायकवाड) /ता.३ महात्मा गांधी जयंती निमित्त तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने शिरढोण (ता.शिरोळ)येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वह्या वाटप करण्यात आले.


     

महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे व समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्याच्या  संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर, कन्या विद्या मंदिर,उर्दू शाळा गाव भाग, उर्दू शाळा माळ भाग या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना  ५० डझन वह्यांचे वाटप समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. सदरच्या वह्या कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नेमिनाथ पाटील व कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विठू बंडगर यांच्याकडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, सरपंच बाबासो हेरवाडे  यांच्या हस्ते देण्यात  आले.
   

यावेळी उपसरपंच रेशमा चौधरी ग्रा.पं.सदस्य संभाजी कोळी, शिवानंद कोरबू, सागर भंडारे, रवी कांबळे, भास्कर कुंभार, पोलीस पाटील अनुराधा जाधव, राजेखान नदाफ, सुरेश कोरे, अरूण ऐनापुरे,आरोग्य सेवक अश्विन चव्हाण, रामचंद्र कांबळे, नागेश कोळी, विजय खंजिरे, स्वप्निल कोरे, राकेश हेरवाडे, विद्यासागर पाटील, बाबासो मालगावे,प्रकाश पानदारे, किरण कोईक सावित्री कोरे, आदी उपस्थित होते.


शिरढोणमध्ये म.गांधी जयंतीनिमित्त वह्या वाटप
Total Views: 2