बातम्या

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण...

Distribution of first installment to eligible beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana


By nisha patil - 2/24/2025 3:00:57 PM
Share This News:



प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण...

कोल्हापूरातील ३८ हजार लाभार्थ्यांना मंजूरी पत्र तर २४ हजार ६०० लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण
 
मे अखेर मोठ्या कार्यक्रमातून पुर्ण झालेल्या घरांचा लोकर्पण सोहळा होणार...

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्याचा सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते राज्यातील काही पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले.या अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना आज या योजनेअंतर्गत लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्र तर २४ हजार ६०० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेत.

घरकुलांचे सर्व हप्ते वेळेत मिळतील याची विशेष दक्षता घ्यावी. सर्व मंजूर घरकुले 'मिशन मोड' वर काम करून ३१ मे २०२५ अखेर पूर्ण करून घ्यावीत. लाभार्थ्याना वाळू -खडी - वीट - इतर साहित्य गावातच उपलब्ध होईल याबाबत जिल्हा परीषदने विशेष नियोजन करावे.

येत्या मे अखेर याबाबत एका मोठ्या कार्यक्रमातून पुर्ण झालेल्या घरांचा लोकर्पण सोहळा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आलीय. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस., प्रकल्प संचालक सुषमा देसाई, यांच्यासह प्रमुख मान्यवर, अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण...
Total Views: 37