बातम्या
भेंडवडेत श्री महावीर संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त भेटवस्तू वाटप
By nisha patil - 2/15/2025 2:59:57 PM
Share This News:
भेंडवडेत श्री महावीर संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त भेटवस्तू वाटप
भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे श्री महावीर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूंचे वाटप आमदार डॉ. विनय कोरे आणि आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भेंडवडे गावचे सुपुत्र, पोलीस हवालदार आयुबखान अकबर मुल्ला यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजीराव पाटील, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेंडवडेत श्री महावीर संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त भेटवस्तू वाटप
|