बातम्या
शिरोळ तालुक्यात शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त धान्य वाटप
By nisha patil - 1/23/2025 9:48:36 PM
Share This News:
शिरोळ तालुक्यात शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त धान्य वाटप
शिरोळ (दि. 23): शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ स्थित श्रावण बाळ वृद्धाश्रम येथे गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिवसेना शिरोळ तालुका यांच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्वसामान्य निराधार, दुबळे आणि वयस्कर नागरिकांना एक वेळचे जेवण मिळावे, या उद्देशाने मोठ्या प्रमाणात धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उदय सुटाळ, अस पाटील, संभाजी गेट संघटक विक्रम घोरपडे, विभाग प्रमुख महादेव सूर्यवंशी तसेच शिवसेनेचे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिरोळ तालुक्यात शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त धान्य वाटप
|