बातम्या
कागलमध्ये ओबीसी व अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप
By nisha patil - 8/22/2023 7:23:53 PM
Share This News:
कागल, दि. २२: कागलमध्ये केडीसीसी बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ओबीसी महामंडळ व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेच्यावतीने मराठा समाज व इतर मागासवर्गीय समाजातील तरुण-तरुणींना उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणात केडीसीसी बँकेच्या वतीने अर्थसहाय्य दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मंजूर कर्ज प्रकरणे रमेश राजाराम कस्तुरे-नानीबाई चिखली, बाजीराव महादेव पाटील-मळगे बुद्रुक, अजिंक्य बाजीराव पाटील- कौलगे, आकाश सतीश पाटील- केंबळी, राहुल ज्ञानदेव माने -कौलगे, संदीप पांडुरंग आंगज- चिमगांव, राजकुमार दत्तात्रय यादव -तमनाकवाडा, युवराज राजाराम पाटील-नंद्याळ, अजित हरिभाऊ माळी- म्हाकवे, अरुण रघुनाथ सातोसे- साके यांना देण्यात आले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नामदेवराव एकल, सौरभ पाटील, बाळासाहेब तुरंबे, डी. आर. चौगुले, सुनील माळी, सदाशिव तुकान, राजू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
कागलमध्ये ओबीसी व अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप
|