बातम्या
गोकुळ चौकात आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पेन्शन मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण
By nisha patil - 12/12/2024 11:10:32 PM
Share This News:
गोकुळ चौकात आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पेन्शन मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण
इचलकरंजी : इचलकरंजीतील गोकुळ चौक, पिंपळ्या गणपती परिसरात आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पेन्शनधारकांना पेन्शन मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना पेन्शन योजनांचा लाभ मिळाला.
कार्यक्रमावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वसाहतीतील नागरिक तसेच अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळ चौकात आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पेन्शन मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण
|