बातम्या

‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध व हरिपाठ पुस्तिका वाटप .

Distribution of scented milk and Haripath booklets on the occasion of Ashadhi Ekadashi through Gokul


By nisha patil - 6/29/2023 4:58:10 PM
Share This News:



कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी प्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे वारकऱ्यांना व भाविक भक्तांना सुगंधी दूध व सार्थ हरिपाठ पुस्तिकांचे वाटप संघाचे चेअरमन मा.अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.

          सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमिताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ता. करवीर येथे पायी दिंडी निघत असते. या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी होत असतात. या पायी दिंडीचे औचित्य साधून आज दिंडीतील वारकऱ्यांना गोकुळ च्या वतीने ५००० सुगंधी दूध पिशवी तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ पुस्तीकेच्या ५००० प्रतीचे वाटप संघाचे चेअरमन मा.अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला .

           या कार्यक्रम प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ,जेष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,संभाजी पाटील, प्रकाश पाटील,राजेंद्र मोरे , बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील ,उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील ,महिला नेतृत्व अधिकारी नीता कामत, संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदि उपस्थित होते .


‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध व हरिपाठ पुस्तिका वाटप .