बातम्या

एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशन, आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि हज फाउंडेशन च्या वतीने नेहरू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष वाटप

Distribution of school uniforms to students of Nehru High School on behalf of NGO Compassion24 Foundation


By nisha patil - 5/8/2023 6:07:12 PM
Share This News:



कोल्हापूर/ दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचालित नेहरू हायस्कूल मधील हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना येथील एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशन, आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि हज फाउंडेशन,कोल्हापूरच्या वतीने नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेष वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशनचे प्रमुख मिलिंद धोंड,उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर होते 
 प्रास्ताविक मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी केले तर स्वागत व पाहुण्यांचा परिचय हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर यांनी करून दिला.यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे सर्व संचालक, संदीप नष्टे,अजित साळोखे अक्षर दालनचे रवींद्र जोशी व वसंत पाठक उपस्थित होते.

यावेळी अक्षर दालनच्या वतीने साहित्य अकादमीच्या वतीने प्रकाशित जवळपास 100 पुस्तके मुस्लिम बोर्डिंग कडे भेट म्हणून सोपविण्यात आली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मिलिंद धोंड यांनी नेहरू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू हायस्कूल स्कुल कमिटी चेअरमन रफिक मुल्ला,शिक्षक वृंद आणि हज फाउंडेशनचे उपाध्यक्ष बालेचांद म्हालदार,कार्याध्यक्ष बाबासाहेब शेख, सचिव इम्तियाज बारगीर,अस्लम मोमीन, समीर पटवेगार,यासीन उस्ताद,उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन 
मुख्याध्यापक अस्लम काझी यांनी केले.


एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशन, आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि हज फाउंडेशन च्या वतीने नेहरू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष वाटप