बातम्या

जिल्हा नेते सतीश माळगे यांची रिपब्लिकन पक्षाच्या सचिव पदी नियुक्ती

District Leader Satish Malge has been appointed as Secretary of the Republican Party


By nisha patil - 11/28/2023 12:33:33 PM
Share This News:



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या कोल्हापूर  च्या जिल्हा कार्यकरणीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री,तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार सचिव पदी जिल्हा नेते सतीश माळगे यांची निवड-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले  साहेब यांच्यावर निष्ठा ठेऊन गेली पंधरा ते वीस वर्षे सतीश माळगे यांनी संपूर्ण जिल्हाभर राजकीय आणि सामाजिक काम केलेले आहे  गोरगरिबांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने भीम महोत्सव सारखे सामाजिक उपक्रम हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल  ट्रष्ट च्या वतीने भोजन दान,वस्त्र दान आणि वृक्षारोपण सारखे पर्यावरण विषयक उपक्रम सतीश माळगे यांनी राबिवले आहेत. कोविड काळामध्ये जिल्हा भर रक्तदान शिबिरे घेऊन ४१९ बॉटल रक्त संकलन केले आहे तसेच विविध सामाजिक  संस्थानी सतीश माळगे यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या कार्याची दखल घेऊन ना. रामदासजी आठवले साहेब यांनी सतीश माळगे यांची जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी संदर्भात सूचित केलेने आज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे ,पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे ,राज्य सचिव मंगळराव माळगे ,राज्य सह सचिव बी.के.कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ,प्रदीप मस्के ,संजय जिरगे आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाअधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये निवडीचे पत्र दिले.

निवडी नंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांचे आशीर्वाद मुंबई येथे पक्ष कार्यालयत सतीश माळगे यांनी घेतले यावेळी पुष्प गुच्छ देऊन ना. रामदासजी आठवले साहेब यांनी सतीश माळगे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभ आशिर्वाद तसेच शुभेच्या दिल्या.


जिल्हा नेते सतीश माळगे यांची रिपब्लिकन पक्षाच्या सचिव पदी नियुक्ती