बातम्या

'करा योग.. रहा निरोग' -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे आवाहन

District Sports Officer Dr Appeal of Chandrasekhar Sakhre


By nisha patil - 6/21/2023 11:33:56 AM
Share This News:



कोल्हापूर, दि.21  :  दैनंदिन ताणतणाव दूर ठेवून निरोगी जीवनासाठी नियमित योगासने करा, असे आवाहन करुन 'करा योग.. रहा निरोग' असा मूलमंत्र जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिला. 

 जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, महाराष्ट्र, गोवा नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती व मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने योग पटूंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगा प्रात्यक्षिके केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, सचिन चव्हाण, योगाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक रवी कुमठेकर, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, रोहिणी मोकाशी, मनीषा पाटील, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक पूजा सैनी आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी योगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे. योगा हा केवळ योग दिनापूरता मर्यादित न राहता नियमितपणे करा,असे  त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना 'फिट इंडिया' प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य भित्तीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

  यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील बाल योग पटूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर कॉमन योगा प्रोटोकॉल मधील विविध योगासने उपस्थितांनी केली. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अर्ध हालासन यासारखी योगासने तसेच प्राणायाम व ध्यान करण्यात आले. ताणतणावापासून कमी करणाऱ्या हस्ययोगाचे प्रकारही सादर करण्यात आले. योग प्रार्थनेने प्रात्यक्षिकांची सुरुवात करण्यात आली. संकल्प व शांतीपाठाणे समारोप करण्यात आला. मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने योग पटूंना खाऊ वाटप करण्यात आले.


'करा योग.. रहा निरोग' -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे आवाहन