विशेष बातम्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 2/19/2025 11:06:24 AM
Share This News:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वा.गोवा येथून शासकीय मोटारीने सावंतवाडी-आजरा मार्गे आनंद निवास गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
सकाळी १०.३० वा.आनंद निवास गारगोटी, ता. भुदरगड, येथे आगमन व राखीव.
सायं. ५ वा.आनंद निवास गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथून राशिवडे, ता. राधानगरीकडे प्रयाण.
सायं. ६ वा. भव्य शिवजयंती व नागरी सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे आगमन.
सायं. ७ वा. राशिवडे, ता. राधानगरी येथून श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूरकडे प्रयाण.
रात्री ८.४० वा. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
रात्री ८.५५ वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
|