बातम्या

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा जिल्हा दौरा

District Tour of Higher and Technical Education Minister Chandrakant Dada Patil


By nisha patil - 10/6/2024 10:19:41 PM
Share This News:



 उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 7.25 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 7.45 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 8.15 वाजता निवासस्थानाहून शेंडापार्ककडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता शेंडापार्क येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शेंडापार्क, कोल्हापूर) सकाळी 9.30 वा. निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वा. गजवणे, ता. गडहिंग्लजकडे प्रयाण. दुपारी 4 वा. आनंद कडूकर यांच्या निवासस्थानी आगमन व सांत्वनपर भेट. (स्थळ : गिजवणे, ता. गडहिंग्लज) 4.30 वा. गडहिंग्लज येथून कोल्हापूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.

            बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी संभाजीनगर येथील निवासस्थानी राखीव. दुपारी 3.45 वा. निवासस्थानाहून नागाळापार्क कडे प्रयाण. दुपारी 4 वा. भाजपा कार्यालय येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. निवासस्थानाकडे प्रयाण. रात्री 8.15 वा. निवासस्थानी आगमन व मुक्काम.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा जिल्हा दौरा