बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

District Tour of Public Works Minister Ravindra Chavan


By nisha patil - 6/2/2024 2:57:02 PM
Share This News:



कोल्हापूर, : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता श्रीअंबाबाई दर्शन. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध कामांची आढावा बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूरच्या नुतनीकरणाचा लोकार्पण कार्यक्रम व कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आभासी पध्दतीने लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमास पालकमंत्री महोदयांसमवेत उपस्थिती. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) सायं. 5 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण.


सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा